कदा
Appearance
कदा Kedah 吉打 கெடஹ் | ||
मलेशियाचे राज्य | ||
| ||
कदाचे मलेशिया देशामधील स्थान | ||
देश | मलेशिया | |
राजधानी | आलोर सतार | |
क्षेत्रफळ | ९,४२६ चौ. किमी (३,६३९ चौ. मैल) | |
लोकसंख्या | २०,००,००० (इ.स. २०१०) | |
घनता | २१२.१ /चौ. किमी (५४९ /चौ. मैल) | |
आय.एस.ओ. ३१६६-२ | MY-02 | |
संकेतस्थळ | http://www.kedah.gov.my/ |
कदा (देवनागरी लेखनभेद: केदा; भासा मलेशिया: Kedah; जावी लिपी: قدح ; चिनी: 吉打 ; तमिळ: கெடஹ் ; सन्मान्य नाव: दारुल अमन, शांततेचा वास ;) हे मलेशियामधील एक राज्य असून द्वीपकल्पीय मलेशियाच्या वायव्येस वसले आहे. सुमारे ९,४०० वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असणाऱ्या कद्यात मुख्यभूवरील प्रदेश व लांकावी हा द्वीपसमूह सामावला आहे. कद्याची उत्तरेस थायलंडाचे सोंख्ला व याला प्रांत असून दक्षिणेस पराक व नैऋत्येस पेनांग ही मलेशियाची राज्ये आहेत. आलोर सतार येथे कद्याची प्रशासकीय राजधानी असून शाही राजधानी आनाक बुकित येथे आहे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- कदा शासनाचे अधिकृत संकेतस्थळ (मलय मजकूर)