इ.स. १९७२
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९५० चे - १९६० चे - १९७० चे - १९८० चे - १९९० चे |
वर्षे: | १९६९ - १९७० - १९७१ - १९७२ - १९७३ - १९७४ - १९७५ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]जानेवारी-जून
[संपादन]- जानेवारी ५ - अमेरिकन अध्यक्ष रिचर्ड निक्सनने स्पेस शटल कार्यक्रम सुरू करण्याचा हुकुम काढला.
- जानेवारी ३० - ब्रिटिश सैनिकांनी उत्तर आयर्लंडमध्ये १४ निदर्शकांना गोळ्या घातल्या.
- जानेवारी ३० - पाकिस्तानने ब्रिटिश राष्ट्रकुलातून अंग काढून घेतले.
- फेब्रुवारी ३ - जपानच्या सप्पोरो शहरात पहिले हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
- फेब्रुवारी २१ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनने चीनला भेट दिली.
- एप्रिल २० - अंतराळयान अपोलो १६ चंद्रावर उतरले.
- मे १५ - अमेरिकेने जपानचे ओकिनावा बेट परत केले.
- मे २२ - श्रीलंकेने नवीन संविधान अंगिकारले.
- मे ३० - इस्रायेलची राजधानी तेल अवीवमध्ये जॅपनीझ रेड आर्मीने लॉड विमानतळावर २४ व्यक्तींना ठार व ७८ ईतरांना जखमी केले.
जुलै-डिसेंबर
[संपादन]- जुलै २० - नेदरलॅंड्सच्या पंतप्रधान बारेंड बियेश्युव्हेलने राजीनामा दिला.
- जुलै २१ - आयर्लंडच्या बेलफास्ट शहरात दहशतवाद्यांनी २२ बॉम्बस्फोट घडवून आणले. ९ ठार, १३० जखमी.
- डिसेंबर १९ - अपोलो १७, चंद्रावर पोचलेले शेवटचे समानव अंतराळयान युजीन सेमन, रॉन एव्हान्स व हॅरिसन श्मिट यांसह पृथ्वीवर परतले.
- डिसेंबर २३ - निकाराग्वाची राजधानी मानाग्वामध्ये ६.५ रिश्टरचा भूकंप. १०,०००हून अधिक ठार.
- डिसेंबर २३ - उरुग्वेयन एर फोर्स फ्लाइट ५७१च्या उरलेल्या प्रवाशांना वाचविण्यात आले. आन्देसवर विमान कोसळल्यावर ७२ दिवस अतिउंच व अतिथंड परिस्थितीत राहताना जगण्यासाठी प्रवाश्यांनी नाईलाजाने मानवमांस खाल्ले. २ प्रवाश्यांनी १० दिवस अतिकठीण डोंगर पार करून काही प्रवासी जिवंत असल्याची माहिती दिली.
- डिसेंबर २९ - ईस्टर्न एरलाइन्सचे लॉकहीड ट्रायस्टार जातीचे विमान फ्लोरिडात मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असताना कोसळले. १०१ ठार.
- डिसेंबर ३० - व्हियेतनाम युद्ध - अमेरिकेने उत्तर व्हियेतनामवरील बॉम्बफेक थांबविली.
जन्म
[संपादन]- एप्रिल १७ - मुथिया मुरलीधरन, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- मे ११ - जेकब मार्टिन, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- जून २० - पारस म्हाम्ब्रे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- जुलै ८ - सौरव गांगुली, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट १ - मसूद राणा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट १५ - बेन ऍफ्लेक, अमेरिकन अभिनेता.
- डिसेंबर २९ - पॅट्रिक राफ्टर, ऑस्ट्रेलियाचा टेनिस खेळाडू.
- ऑगस्ट १७ - हबीबुल बशर, बांगलादेशचा क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट ३१ - क्रिस टकर, अमेरिकन अभिनेता.
- सप्टेंबर २६ - मार्क हॅस्लाम, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २७ - ग्वेनेथ पाल्ट्रो, अमेरिकन अभिनेत्री.
मृत्यू
[संपादन]- मे १ - कमलनयन बजाज, भारतीय उद्योगपती.
- मे २ - जे. एडगर हूवर, अमेरिकेच्या एफ.बी.आय. या पोलीस संस्थेचा संचालक.
- मे १७ - रघुनाथ कृष्ण फडके, शिल्पकार.
- मे २९ - पृथ्वीराज कपूर, हिंदी अभिनेता
- जुलै ७ - तलाल, जॉर्डनचा राजा.
- जुलै ३१ - पॉल-हेन्री स्पाक, बेल्जियमचा पंतप्रधान.
- सप्टेंबर २७ - एस.आर. रंगनाथन, भारतीय गणितज्ञ.